Sunday, February 11, 2018

#जाता जाता

रोजचा रोज नकळत आपण किती गोष्टी अनपेक्षीत पणे बघत आणि असतो आणि लक्षात ठेवत असतो..
रोजची ठरलेली भाजीवाली...आज एवढंच? अजून नको काही का हो?अशी भाजी कडे बघून प्रतिक्रिया नक्की देणार.
दुधा चा रतिभ नाही...एका अजींची दुकानातून मी दूध न्यायचे...पुढे मागे झाली वेळ तरी ठरलेल्या दूध पिशव्या आणि आजी वाट बघत नक्की असणार... माझा मैत्रिणी गेल्या तरी "नक्की द्या ग ताईला" बजावून देणार..😀
घर कामाला येणाऱ्या काकू/ मावशी ह्यां चा शी तर जिव्हाळा फारच... हे वेगळं सांगायला नकोच. सुट्ट्या, मदत, नाटकं , आगाऊपणा आणि त्याच बरोबर बरा नसताना केलेली चौकशी, प्रेमानी आणलेला दिवाळी फराळ .. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
फुल वाले काका आहेत फुलाचा पुडा आणायला गेला की फुलाचा भाव कसा कमी जास्त झालंय, आता ' मोगरा" संपला ताई  आता ही अमुक च फुलं येतात , बेल घालू का तुळस घालू का संवाद चालू.
आई कडे माझा एक आजी बाई बागकाम करायला यायचा अजून हि कधी आल्या की नक्की चौकशी करतात...रस्त्यात भेट ल्या की नेहमी केवढी मोठी झालीस म्हणत डोक्याला हात लावत आशीर्वाद देणार😀
शाळेतल्या मॅडम भेटल्या कधी जाता जाता वाटेत तर काय भरून आल्या सारखा होता..कारण त्यांना आपण कायम लहानच आठवत असतो😂..
पुस्तकं आणायला लायब्ररी मधे गेला की आपलं आवडीचा पुस्तकं आलेला असता किंवा बाजूला ठेवला असता आपल्या साठी, नवा काही सुचवला जाता,त्यामुळे आपण काहीतरी ना कळत वेगळाच अवडीनी वाचायला ही लागतो.

अशा अनेक लोकांना आपण भेटतं राहतो  म्हटलं तर आपला तसा संबंध काही नाही पण आपलं बऱ्यापैकी संवाद होतो आणि म्हणता म्हणता एक नातं च निर्माण होतं.

जाता येतं आपण ठराविक दुकानात आपण बघतो च, एक ठरलेल्या वेळी बेल वाजली की लगेच मावशी आल्या पोळ्या करायला हे कळतच..
गरज आहेच  किंवा नकळत आपण किती अवलंबून असतो.

असाच "जाता जाता "आज ह्या  सगळ्यांची दखल घायवी असा वाटलं..कारण ही सुद्धा आपुलकी, जिव्हाळ्याची ,जीव लावणारी नाती आहेत.. जी जाता जाता आपली "छाप" नक्कीच ठेऊन जातात😀

धनश्री रानडे - गोखले
११.२.२०१८

No comments: