Saturday, February 3, 2018

जीवघेण्या मैत्रिणी..

हो हो बरोबर वाचलत..असाच लिहिलं होतं लहानपणी मी परीक्षेत... आम्ही दोघी जीवघेण्या मैत्रिणी आहोत हे जिवलग च एेवेजी लिहिलं ....😀
आता आठवला की एवढं हसायला येतं..की काही ही काळात नसल्या पासून ची मैत्री आज आता आम्हाला मुली झाल्या तरी आहे तशीच आहे!! ३० हून अधिक काळ झालं..
शाळा,कॉलेज, नोकरी, relocation to US, लग्न, मुलं....
 असा सगळा असून ही काही माणसं / नाती होती तशी राहतात!!!क वर्षातून एकदा एक महिनाभर भेट होते आता..पण भेटला की सगळा होतं तिथून पुढे चालू राहतं... कोण म्हणतं" long distance relationship" is difficult? 😀
आम्हीच काय आमचं लेकी/ नवरे सुध्दा सामील असतात आता आमचं मध्ये..... आनंदानी😀😀!
आज काल कोणाला काय पडलाय कोणाचा...एकदम fast busy life, calculated loka...etc etc
काही प्रमाणत आहे हे खरं.. पण सगळे असे नसतात. काही ना अजून ही माणसं/ नाती ह्याचाही लागतं आहे....अशी माणसं लागणारी, हक्कानी ओरडणारी,प्रेमानं सांगणारी , वाटेल ते बोलता येईल , ऐकता येईल ,दंगा करणारी, मनात आला की" चल जाऊया" म्हणून प्लॅन बनवणारी, रात्र कमी पडेल एवढ्या गप्पा चालू,पोटभर  खादाडी,नवीन काही घडलं की सांगायची घाई.....अशी "नाती" अजून हि आहेत...अशा "जीवघेण्या" (जिवलग) नात्यानं ची " अपूर्वाई" काही वेगळीच असते.....नाही का?

धनश्री रानडे- गोखले
३०/१/२०१८

No comments: