Saturday, February 3, 2018

 सहज

सहज वाटणाऱ्या गोष्टी च अवघड होऊन बसल्या आहेत...बरोबर ना? किंवा आपण केल्या आहेत...
Etiquettes / social Obligation....!!
अशा ह्या २ मोठ्या शब्दानं मुळे असेल ( spelling   ‌पण सहज येत नाही,,😛)
विचारुन , सांगून च कोणाही कडे जायचं... बिनधास्त जाऊन धडकणे प्रकार नाहीसा होत चाललाय... अर्थात आपल्या कडे ही कोणी अचनक आला की " आत्ता कसे काय?" सवय राहिलीच कुठाय 😃

कौतुक सुध्दा सहज नाही ..मोजून मापून..कारण सहज छान म्हंटले की शंका येते हो... किंवा एकदम काय असा अचानक...!!!

चांगुल पणा ही फार दाखवून चालत नाही...कारण आजकाल तो "सहज" राहिलेला च नाही!

काम सोडून "सहज "असकाही कोणी कोणाशी बोलत ही नसता...कारण वेळ सहसा " सहज "असतोच कुठे?

"सहज" जाता जाता कोणाला तरी आवाज टाकून "सोडू का"? मी ही तिकडेच चाललीय... पण आता काय ola/ uber असतेच सांगितलेली ..

आहे ना वेळ, गडबडीत नाही ना? बोलू का ?असा विचारतच phone करायचा असतो.  असा आठवण येऊन "सहज" phone नाहीच बरका.

"सहज" कोणाशी गट्टी जमली असा ही होत नाही.. कारण सगळं उथळ च आहे..इतका जीव टाकून कोणी गट्टी जमावता का?

Shopping, weekend parties, get-togethers, one day trips,plans .... सगळ आहे चालू ते तरी आहे  का चालू " सहज" म्हणून की ते ही " peer pressure"😀

असाच हे "सहज" सगळं डोक्यात आला आणि मांडले..बघुया आता तितक्या "सहजपणे "ह्या "weekend"  Kay करायला जमतंय का ते😉

धनश्री रानडे- गोखले
३/२/२०१८

No comments: